ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा 100 टक्के निकाल

प्रथम क्रमांक ऋतुजा बेलोस्कर

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून बसलेले सर्वच्या सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 100 टक्के लागला आहे, अशी माहिती अलिबाग जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी दिली. या परिक्षेत प्रथम क्रमांक ऋतुजा राजेश बेलोस्कर (अलिबाग), व्दितीय क्रमांक नम्रता नारायण पाटील (पेण), तृतीय क्रमांक श्वेता संतोष कावजी (खंडाळे-अलिबाग) आणि चतुर्थ क्रमांक सोनल विलास पाटील (उरण) यांना मिळाला. चारही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत सदरची परीक्षा घेण्यात आली होती. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल अलिबाग यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 27 परीक्षार्थी बसले होते. या पैकी सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल. रायगड जिल्ह्याची उज्वल यशाची परंपरा या वर्षी कायम राहीली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांच प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे, उपाध्यक्ष आप्पा बाळ, रायगड जिल्हा ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाह जिजा घरत, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, प्रमुख कार्यवाह प्रकाश पाटील, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, कार्याध्यक्ष तसेच जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा शैला पाटील व जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक, ग्रंथमित्र नागेश कुळकर्णी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे व्यवस्थापक म्हणून सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी काम पाहिले.

Exit mobile version