। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर येथील के.ई.एस इंग्लिश मिडीयम च्या ठकूबाई खारपाटील स्कूलचा शेकडा निकाल 100 टक्के इतका लागला असून परीक्षेला बसलेले 25 पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात शाळेत दहावी परीक्षेत चिन्मय गणेश गव्हाणकर ह्याने 89.80 टक्के गुण मिळवून शाळेत सर्वप्रथम आला तर वरद प्रमोद पाटील ह्याने 86.60 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा आला.
तसेच श्रावणी प्रशांत पाटील हिने 86.20 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली प्रणव रमेश केणी ह्याने 83.80 टक्के गुण मिळवून चौथा आला तर आकांशा अभिमन्यु पाटील ह्याने 83.टक्के गुण मिळवून शाळेत पाचवी आली यशस्वी विद्यार्थ्यांनचे शाळेचे अध्यक्ष पी.पी खारपाटील उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील प्रशासकीय अधिकारी आर्यन पाटील मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे ह्या सर्वांनी अभिनंदन केले.
चिरनेर शाळेचा 97.75 टक्के निकाल
चिरनेर येथील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक दहावी परीक्षेचा शेकडा निकाल 97.75 टक्के इतका लागला असून दहावीच्या परीक्षेत रिया विजय म्हात्रे हिने 90.80 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली तर विनिता शेखर वशेणीकर हिने 88.60 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरी आली आरती हनुमंत पाटिल हिने 84.60टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली आज्ञा जगदिश पाटील हिने 83.40टक्के गुण मिळवून चौथी आली तर कक्षा रमेश म्हात्रे हिने 82.40 टक्के गुण मिळवून पाचवी आली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे शाळेचे अध्यक्ष पी.पी खारपाटील उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील, मुख्याध्यापक सुरदास राहुत, मदन मोकल, अशोक पाटील या सर्वांनी अभिनंदन केले