व्यावसायिक सिलिंडर दरात 100 रुपयांची कपात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. 1 सप्टेंबरपासून 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांपर्यंत मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली असून, 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किंमतीतच उपलब्ध असणार आहे.

दिल्लीत एक 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपर्‍यात मिळणार आहे.

Exit mobile version