मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत असताना आता परदेशातून मुंबईत आलेले 100 पेक्षा अधिक प्रवासी गायब झाले आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असतानाच राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती जारी केली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेले हे सगळेच प्रवासी अती धोकादायक देशांमधून मुंबईत आले होते.
महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 झाली आहे. तर 11 संशयित रुग्णांचे सॅम्पल जिनोम सीक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत.
आफ्रिकन देशातून आलेले 109 प्रवासी मुंबईतून गायब
