दहावीचा निकाल जाहीर; पहा एका क्लिकवर

| रायगड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. टक्केवारीनुसार निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत.

निकाल येथे पाहा एका क्लिकवर

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/

Exit mobile version