दहीहंडी सराव बेतला जीवावर; सहाव्या थरावरून कोसळून बालगोविंदाचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

दहीहंडीचा सराव सुरू असताना 6 व्या थरावरून कोसळून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे नवतरूण मित्रमंडळाचे पथक गोविंदाचा सराव करत होते. या पथकात महेश रमेश जाधव (11) या चिमुकल्या गोविंदाचा समावेश होता. या पथकाने 6 थर लावले होते. महेश 6 व्या थरावर चढला होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास तो 6 व्या थरावरून कोसळला आणि त्याला झेलण्याच्या आत तो जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी दहिसर पूर्वेच्या प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मोठी शोककळा पसरली आहे.

Exit mobile version