जिल्ह्यात 118 रुग्ण; 10 जणांचा मृत्यू तर 81 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी नव्याने 118 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 81 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बुधवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 60, पनवेल ग्रामीण 15, खालापूर 4, कर्जत 5, पेण 2, अलिबाग 25, मुरुड 1, रोहा 3, सुधागड 1, महाड 2 असे एकूण 118 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर उरण, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या 6 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे पनवेल ग्रामीणमध्ये 4, अलिबागमध्ये 3, पेणमध्ये 2 तर कर्जतमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 65 हजार 050 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 59 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 199 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 570 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version