जिल्ह्यात १२.६९ मि.मी. पाऊस

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.69 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जूनपासून आजपर्यंत एकूण सरासरी 1 हजार 811.35 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये अलिबाग 13 मि.मी., पेण 3 मि.मी., मुरुड 11 मि.मी., पनवेल 8.20 मि.मी., उरण 20 मि.मी., कर्जत 4.40 मि.मी., खालापूर 10 मि.मी., माणगाव 11 मि.मी., रोहा 4 मि.मी., सुधागड 6 मि.मी., तळा 18 मि.मी., महाड 14 मि.मी., पोलादपूर 48 मि.मी, म्हसळा 14 मि.मी., श्रीवर्धन 12 मि.मी., माथेरान 6.40 मि.मी.असे एकूण पर्जन्यमान 203.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 12.69 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 58.40 टक्के इतकी आहे.

Exit mobile version