लोकअदालतमध्ये 1227 प्रकरणे निकाली

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

तालुका विधी सेवा समिती, श्रीवर्धन व म्हसळा आणि वकील संघटना श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.12) श्रीवर्धन दिवाणी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 2660 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1227 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून 26 लाख 4 हजार 72 रुपये रकमेची वसुली झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाणी व फौजदारी 110 प्रकरणांपैकी 43 निकाली निघाली. ग्राम पंचायती, नगर परिषद, वीज मंडळ, भारत संचार निगम लि., राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्था इ.ची 2550 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1184 प्रकरणे निकाली निघून त्याद्वारे वर उल्लेखित रक्कम वसूल झाली. या लोकअदालतच्या कामकाजात श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली जवळगेकर यांच्यासह सर्व वकील वर्ग सहभागी झाले होते.

Exit mobile version