। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात शनिवारी 134 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान समोर आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या संसर्गित रुग्णांची तालुक्यातील एकूण संख्या 21 हजार 504 झाली आहे. तर 33 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
शनिवारी तालुक्यात आढळून आलेल्या 134 रुग्णांमध्य चेंढरे 29, अलिबाग शहर 27, कुरुळ1, पेझारी 8, गोंधळपाडा 6, पोयनाड 4, कामार्ले 4, थळ 3, नवगाव 3, चौल 3, झिराड, चोंढी, उसर, धोकवडे, सासवणे, भाल, पांडवादेवी, रामराज प्रत्येकी दोन, बोरीस, खिडकी, थेरोंडा, नवेदर बेली, मांडवा, खानाव, कामत, वळके, धोलपाडा, तीनविरा, मेढेखार, शहाबाज, हाशिवरे, चिखली, कुर्डूस प्रत्येकी एक असा समावेश आहे.
आतापर्यंत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 21 हजार 504 झाली आहे. 612 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 204 जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 822 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.