। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये एक भारतीय प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळली आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर, 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही बस 40 प्रवाशांना घेऊन पोखराहून काठमांडूकडे जात होती. या बसमध्ये बहुतेक प्रवासी भारतीय होते.
पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन ही बस काठमांडुकडे जात होती. या बसमध्ये 40 प्रवासी असून यातील बहुतेक प्रवासी भारतीय होते. अबुखैरेनी परिसरातील मर्स्यांगडी नदीत हि बस कोसळली. अपघातानंतर तात्काळ स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचे मृतदेह सापडले असून 16 प्रवाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आणले. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे कारण अद्याप अमोर आलेले नाही. मात्र, या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, अपघाताच्या सर्व परिस्थितींची सखोल तपासणी केली जात आहे.