| नवी मुंबई | वार्ताहर |
इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर बदनामी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
करंजाडे येथे राहणारी 14 वर्षीय तरुणी कामोठे येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. एक नोव्हेंबर रोजी तिची आई घरी आली असता मुलीने दरवाजा न उघडल्याने त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर महिन्यात शाळेतील वर्गात एका विद्यार्थ्याने पाठीमागून पाठीला हात लावत असलेला फोटो काइन मास्टर या व्हिडिओ मेकर ॲपवर एक व्हिडीओ एडिट केला होता. तसेच खाली अश्लील शब्द लिहून वेगवेगळ्या दोन इन्स्टा आयडीवरून तो प्रसारित केला होता. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.