| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील पाचवा आणि शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदान झाले आहे. दिंडोरीत सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले. मात्र, आठ राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान सर्वात कमी झाले आहे.
भिवंडी मतदार संघात 14.79 टक्के, धुळे मतदार संघात 17.38 टक्के, दिंडोरी मतदार संघात 19.50 टक्के, कल्याण मतदार संघात 11.46 टक्के, उत्तर मुंबई मतदार संघात 14.71 टक्के, उत्तर मध्य मुंबई मतदार संघात 15.73 टक्के, उत्तर पूर्व मुंबई मतदार संघात 17.01 टक्के, उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात 17.53 टक्के, दक्षिण मुंबई मतदार संघात 12.75 टक्के, दक्षिण मध्य मुंबई मतदार संघात 16.69 टक्के, नाशिक मतदार संघात 16.30 टक्के, पालघरमतदार संघात 18.60 टक्के, ठाणे मतदार संघात 14.86 टक्के मतदान झाले आहे.