आ. जयंत पाटील यांच्या विकास निधीतून मिठागर रस्त्यासाठी 15 लाखांचा निधी

। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यामधील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मुख्य रस्ता ते मिठागर गावातील सुमारे चारशे मीटर पेक्षा जास्त रस्ता डांबरीकरण होण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या आमदार निधीमधून 15 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या रस्त्याचे रस्त्याचे भूमिपूजन शेकाप जि.प. सदस्या नम्रता कासार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी वावडुंगी ग्रामपंचायत चे माजी सरपंच अजीत कासार,संतोष पाटील,राजेश कर्जेकर,चंद्रकांत बैकर,महेश ठाकूर,सुबोध मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. मिठागर येथील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब व खड्डेमय झाला होता.या रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून ग्रामस्थांनी नम्रता कासार यांच्याशी संपर्क साधला होता.सदरील रस्त्याला आमदार जयंत पाटील यांनी निधी दिल्यामुळे लवकरच हा रस्ता तयार होणार आहे.याबद्दल ग्रामस्थांनी आमदार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आ.जयंत पाटील यांनी या रस्त्यासाठी निधी दिल्यामुळे सदरचा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.विकासाची कामे फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकणार आहे.ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षासोबत राहणे खूप आवश्यक आहे.या पुढे सुद्धा या भागातील विकासकामे जलद गतीने पूर्ण करणार – नम्रता कासार,जि.प.सदस्या

Exit mobile version