| पोलादपूर | शैलेश पालकर |
महाडच्या शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. स्नेहल सुशिल कांबळे यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच रसायनशास्त्र विषयातील पीएच.डी. ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी बहाल केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील बलखंडे व उपप्राचार्य डॉ.महेश वल्ले यांनी दिली. यामुळे महाविद्यालयाच्या 20पूर्णवेळ प्राध्यापकांपैकी 15 प्राध्यापक पीएचडीधारक डॉक्टरेटप्राप्त झाले आहेत.
पीएच.डी. पदवीसाठी डॉ.स्नेहल कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये संशोधनाचे कार्य केले. सदर संशोधनासाठी त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांचे मार्गदर्शन लाभले. स्टडीज ऑॅन स्ट्रक्चरल ऍंड सिंथेटिक प्रॉपर्टीज ऑॅफ मिक्स्ड मेटल टार्टस या विषयावर सखोल संशोधन करून डॉ. स्नेहल कांबळे यांनी मुंबई विद्यापीठाला आपला संशोधन प्रबंध सादर केला. पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने डॉ.स्नेहल कांबळे यांचा पुष्पगुच्छ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला.
सुंदरराव मोरे महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाजाबरोबरच सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष इत्यादी विभागांचे कामकाजामध्ये विभाग प्रमुख म्हणून योगदान देत तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून डॉ. स्नेहल कांबळे यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन समारंभामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.
पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयामधील डॉ.महेश वल्ले, डॉ.समीर बुटाला, डॉ.नाथीराम राठोड, डॉ.मंगेश गोरे, डॉ.प्रभाकर गावंड, डॉ.जयश्री जाधव, डॉ. सुधाकर जाधव, डॉ.बालाजी राजभोज, डॉ.पोपट भोसले, डॉ.शैलेश जाधव, डॉ.वसंत डोंगरे, डॉ.सुदर्शन दवणे, डॉ.राम बरकुले यांच्यानंतर आता डॉ. स्नेहल कांबळे या पंधराव्या पीचएचडी पदवी धारक डॉक्टरेटप्राप्त प्राध्यापक ठरल्या आहेत. डॉक्टरेटप्राप्त केल्याबद्दल शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. संतोष काळे, उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख, सचिव अशोकबंधू देशमुख खजिनदार किशोर मोरे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनींनी डॉ. स्नेहल कांबळे यांचे आणि त्यांच्या परिवाराचे विशेष अभिनंदन केले असून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.







