। मुंबई। प्रतिनिधी ।
झारखंड (रांची) येथे सुरु असलेल्या 15 वर्षांतील फ्री स्टाईल मुलींच्या कुस्ती स्पर्धेत श्रावणी लवटे व अहिल्या शिंदे यांनी चांगली कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सांघिक तृतीय विजेतेपद मिळविण्यात यश आले आहे.
पदकविजेते कुस्तीगीर पुढीलप्रमाणे आहेत. 33 किलो-कस्तुरी कदम (कांस्यपदक) माळ्याची शिरोली कोल्हापूर येथे पै नितीन पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेते. 36 किलो श्रावणी लवटे (सुवर्णपदक) एनआयएस कुस्ती केंद्र दोनवडे कोल्हापूर पै संदीप पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. 42 किलो – ऋतुजा गुरव (रौप्यपदक) कोल्हापूर, पै. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 46 किलो- संजीवनी ढाणे (कांस्यपदक) सोलापूर ढाणे वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 50 किलो- अहिल्या शिंदे (सुवर्णपदक), मारकड कुस्ती केंद्र इंदापूर पै. मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 58 किलो समृद्धी कारंडे (कांस्यपदक) शिवछत्रपती कुस्ती संकुल मांजरी पै सत्यवान सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 62 किलो आयुष्का गादेकर (कांस्यपदक) भारतीय खेळ प्राधिकरण मुंबई साई पै अजय सिंग व पै अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
सर्व पदकप्राप्त व सहभागी कुस्तीगीरांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.