अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालक्यात रविवारी 20 जून रोजी तब्बल 156 नव्या रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने उपचारादरम्यान काही रुग्णाला आपला जीव गमवावा लागला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 128 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.आतापर्यंत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 456 झाली आहे. यापैकी 434 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 13 हजार 823 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 199 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यात 156 नवे रुग्ण
