जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शनिवारी रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये 158 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 195 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 282 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शनिवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 72, पनवेल ग्रामीण 29, उरण 6, खालापूर 5, कर्जत 12, पेण 14, अलिबाग 6, मुरुड 1, माणगाव 7, रोहा 1, सुधागड 1, श्रीवर्धन 1, तर पोलादपूर 1 असे 158 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 196, पनवेल ग्रामीण 36, उरण 4, खालापूर 11, अलिबाग 12, माणगाव 1, मुरुड 3, रोहा 4, श्रीवर्धन 6, म्हसळा 5, महाड 3 आणि पोलादपूर 1 अशा एकूण 282 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 332 झाली आहे. यापैकी 2 लाख 14 हजार 435 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 702 झाला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 195 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.