शिखर धवनवर पहिली बोली
श्रेयस अय्यरसाठी सर्वाधिक 12.25 कोटींचा बोली
। बंगळुरू । वृत्तसंस्था ।
जगातील श्रीमंत टी-20 क्रिकेट लीग म्हणजेत आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. शनिवारी महालिलावाचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी 161 खेळाडूंवर बोली लागली यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे या महालिलावात एकूण 590 खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसतील. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यापेक्षा अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करुन मजबूत संघ बांधणी करण्यावरही फ्रँचायझी भर राहिल्याचे लिलावात दिसून आले.
खेळाडू बोली संघ
श्रेयस अय्यर 12.25 कोटी – केकेआर
ट्रेंट बोल्ट – 8 कोटी राजस्थान रॉयल्स
रबाडा 9.25 कोटी पंजाब
कमिन्स 7.25 कोटी केकेआर
अश्विन 5 कोटी राजस्थान
धवन 8.25 कोटी पंजाब किंग्ज
शिमरॉन हेटमायर 8.5 कोटी राजस्थान रॉयल्स
पॅट कमिन्स 7.75 कोटी कोलकाता नाईट रायडस
सायलेंट टाय ब्रेकरचा नियम
जेव्हा दोन संघ लिलावात मटायफ करतील आणि त्या खेळाडूच्या बोलीसाठी त्यांचे सर्व पैसे लावतील, तेव्हा ते अंतिम मबंदफ बोलीची रक्कम जमा करू शकतात. ज्या संघाची सर्वाधिक बोली असेल, त्या संघाला संबंधित खेळाडू मिळेल. अतिरिक्त बोलीची रक्कम बीसीसीआयकडे जमा केली जाईल आणि ती 90 कोटींच्या रकमेचा भाग असणार नाही.
मुंबईने बोल्ट गमावला
ट्रेंट बोल्टचा समावेश जगातील अव्वल गोलंदाजांमध्ये केला जातो. पॉवरप्लेमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो. तसेच चांगले क्षेत्ररक्षण करण्यासाठीही तो ओळखला जातो. 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 3.20 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे. ट्रेंटला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्साने प्रयत्न केले खरे, पण त्यांना अखेर ट्रेंट बोल्टला गमवावे लागले.
लिवाल सुरू असतानाच ह्युज कोसळले
आयपीएल सुरू असतानाच ऑक्शेनियर र्कीसह एवाशरवशी जमिनीवर कोसळले. त्याला भोवळ आल्याची बातमी येत आहे. श्रीलंकेच्या हसरंगावर बोली लागत असतानाच ही घटना घडली. त्यामुळे लिलाव थांबवण्यात आला आहे. त्यांना काय झाले आहे याची माहिती अजून मिळालेली नाही. श्रीलंकेचा फिरकीपटू वानंदु हसरंगा याच्यावर बोली लावणे सुरू होते. हसरंगा 10 कोटीपर्यंत पोहचला असतानाच बोली लावणारे र्कीसह एवाशरवशी खाली कोसळले. ते खाली पडताना तोंडावरच पडल्याने त्यांना गंभीर जखम झाली असण्याची शक्यता आहे.