अलिबाग तालुक्यात 16 कोरोना रूग्ण

86 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात रविवार दि. 3 जुलै रोजी कोरोनाच्या 16 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील 86 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 564 झाली आहे. यापैकी 631 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 86 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version