विनेशला मिळालेली 16 कोटींची बक्षीस?

खोटी अफवा असल्याचा सोमवीर राठीचे स्पष्टीकरण

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही, मात्र, तिने कोट्यवधी भारतीयांची मने नक्कीच जिंकली आहेत. आता मायदेशी परतलेल्या विनेश फोगाटबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात तिला विविध संस्था, व्यावसायिक आणि कंपन्यांकडून 16 कोटी रुपयांची बक्षीसे मिळाल्याचा दावा केला जात आहे. मात्र विनेशचा पती सोमवीर राठी याने तो फेटाळला आहे.

विनेशने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण स्पर्धेपूर्वी वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर तिने रौप्यपदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती, पण लवादानेही तिचे अपील फेटाळून लावले होते. आता मायदेशी परतलेल्या विनेश फोगाटबद्दल एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात तिला विविध संस्था, व्यावसायिक आणि कंपन्यांकडून 16 कोटी रुपयांची बक्षीसे मिळाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर, आता तिचे पती सोमवीर राठी यांनी यामागचे संपूर्ण सत्य सांगितले आहे. सोमवीर राठी यांनी 18 ऑगस्टच्या सायंकाळा व्हायरल होत असलेल्या एका पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत, हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विनेशला अद्याप कुणाकडूनही पैशांच्या स्वरुपात बक्षीस मिळालेले नाही.

तसेच, अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहनही त्यानी चाहत्यांना केले आहे. याच बरोबर हे लेकप्रियता मिळवण्याचे एक साधन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे आमचे नुकसान तर होईलच, शिवाय सामाजिक मूल्यांनाही हानी पोहोचेल. हे केवळ स्वस्तातली लोकप्रियता मिळविण्याचे साधन मात्र आहे. भारतातील स्वागतानंतर बोलताना विनेश फोगाट म्हणाली होती, त्यांनी मला गोल्ड मेडल दिले नाही, मात्र लोकांनी मला जे प्रेम आणि सन्मान दिला तो एक हजार गोल्ड मेडलपेक्षाही अधिक आहे.

Exit mobile version