। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात गुरूवार दि. 3 मार्च रोजी कोरोनाच्या 16 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज देखील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. 9 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गुरूवारी पनवेल महापालिका हद्दीत 6, पनवेल ग्रामीण 3, खालापूर 1, पेण 2, अलिबाग 1, रोहा 1, श्रीवर्धन 2 असे 16 रुग्ण आढळले. उरण, कर्जत, मुरुड, माणगाव, म्हसळा , सुधागड, तळा, महाड व पोलादपूर या 9 तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 562 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 646 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा सुदैवाने 4 हजार 693 वरच थांबला आहे. सद्यस्थितीत 223 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.