| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीची नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये महिला टी-20 विश्वचषकाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महिलांच्या क्रिकेट विकाराबाबत चर्चा झाली असून 2030 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात 16 महिला संघ खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबर महिला आणि पुरुष क्रिकेट यांच्यात समानता राखण्याचीही वचनबद्धता पाळली जाईल, असे सांगितलं आहे. 2009 मध्ये महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्यावेळी 8 संघ सहभागी झाले होते. 2016 साली सहभागी संघांची संख्या 10 करण्यात आली होती. त्यानंतर आता 2026 मध्ये सहभागी संघांची संख्या 12 होणार असून 2030 पर्यंत 16 संघ सहभागी होतील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.