रायगड लोकसभा मतदार संघात 17.18 टक्के मतदान

| अलिबाग | प्रतिनिधी |

सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात 17.18 टक्के मतदान झाले. अलिबाग, विधानसभा मतदार संघात 18.06 टक्के श्रीवर्धन मतदार संघात 12.35 टक्के, पेण मतदार संघात 14 टक्के, महाड मतदार संघात 12 टक्के व गुहागर मतदार संघात 25.5 टक्के व दापोली मतदार संघात 22.33 टक्के मतदान झाले. चार तासाच्या कालावधीत गुहागर दापोली व अलिबाग या मतदार संघात अधिक तर श्रीवर्धनमध्ये कमी मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

Exit mobile version