राज्यात सकाळसत्रात 17.51 टक्के मतदान

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (दि. 13) सकाळी 7 वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण 11 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.51 टक्के मतदान झाले आहे.

नंदुरबार मतदारसंघात 22.12 टक्के, जळगाव मतदारसंघात 16.89 टक्के, रावेर मतदारसंघात 19.03 टक्के, जालना मतदारसंघात 21.35 टक्के, औरंगाबाद मतदारसंघात 19.53 टक्के, मावळ मतदारसंघात 14.87 टक्के, पुणे मतदारसंघात 16.16 टक्के, शिरूर मतदारसंघात 14.51 टक्के अहमदनगर मतदारसंघात 14.74 टक्के, शिर्डी मतदारसंघात 18.91 टक्के, बीड मतदारसंघात 16.62 टक्के मतदान झाले आहे.

चार तासाच्या कालावधीत नंदुरबार मतदार संघात सर्वात जास्त त्या खालोखाल जालना व औरंगाबाद मतदार संघात अधिक मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.

Exit mobile version