पाली नगरपंचायत निवडणुकीत 17 उमेदवार रिंगणात

छाननीत 28 नामनिर्देशनपत्रांपैकी 8 बाद, तर 3 दुबार
| पाली/बेणसे | वार्ताहर |
पाली नगरपंचायत निवडणुकीत 4 प्रभागांतील चार जागांसाठी सोमवारी (ता.3) सायंकाळपर्यंत 28 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. मंगळवारी (ता.4) झालेल्या छाननीत यातील 8 नामनिर्देशनपत्र बाद झाले आहेत, तर 3 दुबार निघाले. बुधवारी (ता.5) अशी माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली. आता एकूण 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पालीत पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. सोमवारी (ता.10) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यावेळी खर्‍या अर्थाने कोण कोण निवडणूक रिंगणात आहे ते कळेल. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2, 5, 8 व 14 या 4 प्रभागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 2 व 14 साठी सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 5 आणि 8 साठी सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे. ही लढत अटीतटीची होणार असून, मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

Exit mobile version