| तळा | वार्ताहर |
शहर येथे भूमिगत विद्युतवाहिनी टाकणे यासाठी सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच तळा वासियांची सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यातून आता लवकरच सुटका होणार असल्याचे बोलले जाते. दुर्गम आणि डोंगराळ भागात नागरिक राहतात. सोसाट्याचा वारा, चक्रीवादळामुळे रहिवाशांना अनेक तास अंधारात राहण्याची वेळ येते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी तळा शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य परिसरात कमीत कमी हानी होण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पात शहराला वीजपुरवठा करणाऱ्या क्षमतेत वाढ होणार असून उच्चदाब व लघुदाब अशा दोन रोहित्रांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.







