। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दि.१४) पहाटे एका इको कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 18 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली तर चालकासह ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
सदर अपघातातील इको कार ही पुण्यावरून मुबंईकडे जात असताना पुणे लेनवरून खालापुरातील माडप बोगद्याच्या पुढे आल्यावर एका कंटेनर आपत्कालीन छेद दुभागून यु टर्न घेत मुबंईकडे जात असताना समोरून येणाऱ्या इको कारने कंटेनरला जोरदार धडक देत भीषण अपघात झाला.
या अपघातात कारमधील अर्चना किसन राऊत (वय 18) हिचा जागीच मृत्यू झाला. पाच प्रवासी व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.