युक्रेनमध्ये अडकलेले 182 विद्यार्थी मुंबईत

| मुंबई | प्रतिनिधी |
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे. आता पर्यंत 600 विद्यार्थीना मायदेशात परत आणण्यात आले आहे. मुंबईत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले. ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात आले. 182 विद्यार्थी दाखल झाले. सरकारच्या वतीने मी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारने व्यवस्था केली आहे. विद्यार्थी थोडे दडपणाखाली जाणवत होते, त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. भारतीय दुतावासाच्या संपर्काने आम्ही सीमेवर पोहोचलो, तेथून आम्हाला विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. मायदेशी परतल्याचा आनंद शब्दातीत आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Exit mobile version