19 वर्षीय तरुणी बेपत्ता

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा शहरातील भोईरवाडी येथील पूजा बबन जाधव (19) ही आपल्या राहत्या घरातून 12 जानेवारी रोजी कोणालाही न सांगता निघून गेली व ती आजतागायत परत आली नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी ती हरवली असल्याची तक्रार तळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सदर मुलीची उंची 5 फूट असून, रंग गोरा व चेहरा उभट आहे. शरीर बांधा सडपातळ असून, घरातून निघून गेली तेव्हा अंगावर काळ्या रंगाचा टॉप, लाल रंगाची लेगीज, निळ्या रंगाची ओढणी परिधान केली होती. अशा वर्णनाची मुलगी दिसल्यास तळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार पी. एस. चांदोरकर यांनी केले आहे.

Exit mobile version