। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घेट होत असून नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ३४ हजार २८१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ८९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसऱ्या बाजुला दिवसभरात ३ लाख ५२ हजार ७८४ जणांनी कोरोनावर मात केली.
सध्या देशात १८ लाख ८४ हजार ९३७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांची संख्या ही ४.५९ टक्के इतकी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १४.५० टक्क्यांवर पोहोचला आहे.