| महाड | प्रतिनिधी |
कुठलंही नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवी संकट सर्व प्रथम मदती साठी धावणार्या सामाजिक संस्थांमध्ये महाड मधील अंजुमन दर्दमदाने तालीम व तरक्की ट्रस्ट या संस्थेचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते. ज्या ज्या ठिकाणी दर्द दुःख असेल अशा ठिकाणी सुख व मायेचा हात देण्यासाठी मानवतेच्या भावनेतून ही संस्था धाव घेत असते.
दि. 21 व 22 जुलैच्या अतिवृष्टी नंतर जो महाप्रलय महाड शहर व तालुक्यात आल्यानंतर आपले सर्वस्व गमावलेल्या महाड शहर व तालुक्यातील पूरग्रस्त गावातील नागरीकांसाठी अंजुमन दर्दमंदाने तालीम व तरक्की ट्रस्टच्या इसाने कांबळे येथील हाय स्कुल मध्ये अन्न छत्रच उघडण्यात आले. या ठिकाणी दररोजचा नाष्टा दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असे अन्न व खाद्य पदार्थाचे 1500 ते 2000 पॅकेटचे पार्सल दर रोज पुरग्रस्तांना गेली 12 दिवस पुरवले जात आहे. या कामी अंजुमन दर्दमंद संस्थेला पनवेल येथील मस्जिद येथील तरुणांकडुन आवश्यक असणार्या सामानसुमाना चा पुरवठा करण्यात आला आहे.
अंजुमन दर्द मदाने तालीम व तरक्की ट्रस्ट चे अध्यक्ष मुफ्ती रफीक म शफी पुरकर व इतर सर्व संचालक पदाधिकारी या अन्नदान पार्सल सेवेच्या कार्यावर देखरेख ठेवून आहेत.