रायगड जिल्ह्यात 21 रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू, नऊ तालुक्यात नवीन रुग्ण नाही

Corona Viruses against Dark Background

50 कोरोनामुक्त; जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 21 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नऊ तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी पनवेल महापालिका हद्दीत 4, पनवेल ग्रामीण 5, खालापूर 1, कर्जत 2, पेण 3, श्रीवर्धन 4, महाड 2 असे 21 रुग्ण आढळले. उरण, अलिबाग, मुरुड, माणगाव, रोहा, सुधागड, तळा, म्हसळा, पोलादपूर या नऊ तालुक्यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 14 हजार 347 झाली आहे. यापैकी 2 लाख 09 हजार 264 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 691 वर गेला आहे. सद्यस्थितीत 392 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version