। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यात कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरू असून सोमवारी तालुक्यात 21 रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील आत्तापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 19,533 इतकी आहे. सोमवारी 50 जण बरे झाले आहेत व 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत 577 जणं मृत्यू पावली असून 240 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर, उपचाराने बरे होऊन आजपर्यंत 18,716 जणं डिस्चार्ज मिळून घरी परतली आहेत.