वर्षभरात जिल्हयात 224 फसवणुकीचे गुन्हे; तब्बल 44 कोटी रूपयांची फसवणुक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयात विविध पोलिस ठाण्यांमध्ये 2021 पासुन 20 जून पर्यंत 224 फसवणुक/अपहाराचे गुन्हे नोंद झाले आहेत. होवुन नागरीकांची 44 कोटी रूपयांची फसवणुक झालेली आहे. फसवणुकीच्या रक्कमेचे एवढे मोठे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नागरीकांमध्ये आर्थिक गुन्हयांबाबत जनजागृती करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणुक योजना, बँक व्यवहार, मालमत्ता खरेदी, गृह प्रकल्प, सावकारी व नोकरी लावण्याचे आमिष देवून फसवणुक अशा महत्वाच्या आर्थिक गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना म्हणुन जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता स्टॅन्डी, पोस्टर व लिपलेट्स तयार करण्यात आले आहेत.
सदर स्टॅन्डी हे उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या/पोलीस ठण्यांना देण्यात आलेले असुन सदरचे स्टॅन्डी हे त्यांनी त्यांच्या विभागात जनजागृती कार्यक्रम स्थळी लोकांच्या माहितीकरीता व प्रसिध्दीकरीता वापरणे बाबत सुचना केलेल्या आहेत.
तसेच पोस्टर व भिंती पत्रके ही हद्दीतील दुरक्षेत्र, पोलीस चौक्या, निबंधक कार्यालय, बँका, नगर व भुरचना कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, न्यायालय, सेतु कार्यालय, बस स्टॅन्ड, तहसिलदार कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु दवाखाने, शाळा/कॉलेज इत्यादी महत्वाच्या ठिकाणी संबंधित आस्थापना यांची पुर्व परवानगी घेवून चिकटविण्याबाबत सांगण्यात आलेले आहेत.
जिल्हा पोलिस दलाकडून नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, योग्य ती खबरदारी, काळजी घेवुनच आर्थिक व्यवहार करावे. तसेच आर्थिक फसवणुकीला बळी पडु नये.

Exit mobile version