। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मिचेल स्टार्कला आयपीएल 2024च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मोठ्या रकमेत विकत घेतले. 24.75 कोटी रुपयांना विकला गेला तेव्हा स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, आतापर्यंतच्या मोसमात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना वगळता स्टार्कला काही विशेष करता आलेले नाही.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटचे षटक आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला दिले. पण स्टार्कने कर्ण शर्माच्या षटकात तीन षटकार मारले आणि कोलकाता आता सामना हरणार असे वाटत होते. पण कर्ण बाद होताच सामना पुन्हा उलटला. स्टार्कने आपल्या तीन षटकांत 55 धावा दिल्या आणि त्याला एकच यश मिळाले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात स्टार्कने आपल्या स्पेलमध्ये एकूण सात षटकार ठोकले आणि यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या स्टार्कच्या नावावर लज्जास्पद विक्रम जमा झाला. आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणार्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्क आता दुसर्या क्रमांकावर आला आहे.
मिचेल स्टार्कची आतापर्यंतची कामगिरी 0/53 वि. हैद्राबाद 0/47 वि. बंगळूरू 2/25 वि. दिल्ली 0/29 वि. चेन्नई 3/28 वि. लखनौ 0/50 वि. राजस्थान 1/55 वि. बंगळूरू