वर्षभरात 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था
देशात तब्बल 25 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग उभे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 25 हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात 2022-23 साठी हे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील डोंगराळ भागात रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी पर्वतमाला या योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. हे उपक्रम पीपीपी अर्थात खासगी आणि सार्वजनिक भागीदारीच्या तत्वावर राबवले जाणार आहेत.

Exit mobile version