25 हजार झाडांचे होणार संरक्षण

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावर वणवे रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या सगुणा रूरल फाउंडेशनला नॅरोगेज मार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचे काम सोपवले आहे. भडसावळे यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन एकूण 25 हजार झाडे लावली होती, त्या सर्व झाडांचे संरक्षण होण्यासाठी संरक्षण करणारे कागद लावले आहेत. डोंगरातील माती कितीही पाऊस झाला तरी खाली येऊ नये यासाठी सांगून रूरल फाउंडेशन कडून माती आणि दगडांना रोखून ठेवण्याचे काम करणारी झाडे यांची लागवड करण्याचे काम जी झाडे करतात, अशी ओळख असलेली वाला, करवंद, शिंदी, रानकेळी तसेच निर्गुडी आणि घायपात या झाडांनाही लागवड करण्याचे उद्दिष्ट शेखर भडसावळे यांनी समोर ठेवले.ती झाडे सगुणा रूरल फाउंडेशन कडून कशीही आणि कुठेही लावली जाणार नाहीत याची काळजी घेतली जगेल. मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गाच्या डोंगर भाग असलेल्या भागात पाच मीटर अंतरावर हि झाडे लावली गेली आहेत. त्याचवेळी दरीच्या भागात जशी जागा उपलब्ध आहे त्या स्वरूपात झाडे लावण्यात आली आहेत. या सर्व प्रकारच्या तब्बल 25 हजार झाडांची निर्मिती सांगून रूरल फाउंडेशनकडून करण्यात आली आहे.
दुसरीकडे कॉक्रीटचे जंगल वाढत असताना हरवत असलेली काळी मैना म्हणजे करवंदे देखील यापुढे माथेरानच्या डोंगरात खायला मिळू शकतात. शिंदी हे झाड माती पकडून ठेवतानाच कोरड्या असलेल्या भागात देखिल जिवंत राहते आणि त्यांचे फायदे निसर्ग मेनी करीत आहे. रानकेळी आणि निर्गुडी हे देखील घायपात प्रमाणे मातीला पकडून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर 21 किलोमीटर पैकी 18 किलोमीटर भागात हि सर्व झाडे सगुणा रूरल फाउंडेशन कडून लावण्यात आली आहेत. त्या सर्व झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी सगुणा रूरल फाउंडेशनकडून झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी कापड बांधण्यात येत आहे. त्याचवेळी झाडांना वेळेवर पाणी मिळावे आणि झाडे आणखी वेगाने वाढावी यासाठी भडसावळे यांच्याकडून एक टीम तयार करण्यात आली आहे. या टीमकडून अनिल निवळकर, परशुराम आगिवले आदी कामावर लक्ष ठेवून आहेत.

Exit mobile version