| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज (दि. 13) सकाळी 7 वाजतापासून सूरु झाले आहे. मावळमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 27.14 टक्के मतदान झाले असून एकूण 11 मतदारसंघात सरासरी 30.85 टक्के मतदान झाले आहे.
नंदुरबार मतदारसंघात 37.33 टक्के, जळगाव मतदारसंघात 31.70 टक्के, रावेर मतदारसंघात 32.02 टक्के, जालना मतदारसंघात 34.42 टक्के, पुणे मतदारसंघात 26.48 टक्के, शिरूर मतदारसंघात 26.62 टक्के, अहमदनगर मतदारसंघात 29.45 टक्के, शिर्डी मतदारसंघात 30.48 टक्के, बीड मतदारसंघात 33.65 टक्के, संभाजीनगर मतदारसंघात 32.37 मतदान झाले आहे.
सहा तासाच्या कालावधीत नंदुरबार मतदारसंघात सर्वात जास्त त्या खालोखाल जालना व बीड मतदारसंघात अधिक मतदान झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.