| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11:30 वाजेपर्यंत चार तासात 27.52 टक्के मतदान झाले. चार लाख 67 हजार 870 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात दोन लाख 46 हजार 198 पुरुष व दोन लाख 21 हजार 671 महिला तसेच इतर एक मतदारांचा समावेश आहे. मतदान करण्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांपेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
जिल्ह्यात पनवेल तालुक्यात 29.51 टक्के, कर्जतमध्ये 29.02 टक्के, खालापूरमध्ये 28.47 टक्के, सुधागडमध्ये 26.48 टक्के, पेणमध्ये 27.87 टक्के, उरणमध्ये 24.99 टक्के, अलिबागमध्ये 28.66 टक्के, मुरूडमध्ये 26.93 टक्के, रोहामध्ये 26.77 टक्के, तळामध्ये 28.97 टक्के, माणगावमध्ये 25.33 टक्के, म्हसळामध्ये 24.44 टक्के, श्रीवर्धनमध्ये 23.59 टक्के आणि महाडमध्ये 26.93 टक्के, पोलादपूरमध्ये 26.40 टक्के मतदान झाले. या चार तासात पनवेल, कर्जत, अलिबाग, खालापूर, तळामध्ये अधिक मतदान झाले.






