जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण तरतूदीपैकी 30 टक्के निधी कोविड- 19 वरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त निधीपैकी रु. 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून रु. 18.19 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सन 2021-22 मध्ये आतापर्यंत रु.26.92 कोटी च्या प्रशासकीय मान्यता देऊन रू.18.19 कोटी वितरीत करण्यात आले असून ऑगस्ट अखेर रू.8.04 कोटी खर्च करण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीमुळे राज्य शासनासमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनांचा फक्त 10 टक्केच निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत एकूण रू. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे.
सन 2020-21 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी रु. 234.00 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली होती व तेवढाच निधीहो प्राप्त झाला होता. कोविड 19 च्या अनुषंगाने संपूर्ण निधी जानेवारी 2021 मध्ये उपलब्ध झाल्यानंतर पुढील 3 महिन्यांमध्ये रु. 202.28 कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आला. आढाव्याच्या अनुषंगाने सन 2020-21 मध्ये रु. 101.32 कोटी इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 50.1 इतकी दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांना खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असल्याने खर्च जरी कमी दिसत असला तरी मार्च अखेर 100 टक्के खर्च करण्यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड 19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून रु. 49.36 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी रु. 34.22 कोटी निधी खर्च झालेला आहे.
अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21 साठी रु. 25.64 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली होती. त्यापैको रु. 25.57 कोटी इतका निधी वितरीत करुन 99.7 टक्के इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21 साठी रु. 35.98 कोटी निधी प्राप्त होता व त्यापैकी रु. 35.37 कोटी इतका प्रत्यक्ष खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी 98.3 इतकी आहे.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांतर्गत सन 2020-21 मध्ये एकूण रु. 295.62 कोटी निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी रु. 263.83 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्ष खर्चाची टक्केवारी 61.5 इतकी आहे.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 करिता रु. 275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु. 89.90 कोटी निधी प्राप्त झाला आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण तरतूदीपैकी 30 टक्के निधी कोविड- 19 वरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त निधीपैकी रु. 27.92 कोटीच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून रु. 18.19 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी ऑगस्ट अखेर रु. 8.04 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 43.5 इतकी आहे. सन 2020-21 मध्ये कोविड 19 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमधून आतापर्यंत रु. 27.92 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी रु. 18.19 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे व ऑगस्ट अखेर रु 8.04 कोटी इतका निधी खर्च झालेला आहे.
अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत सन 2021-22 मध्ये एकूण रु. 25.64 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात त्यापैकी रु.7.69 कोटी इतका प्राप्त झाला आहे.
आदिवासी उपयोजनांतर्गत सन 2021-22 मध्ये एकूण रु. 35.98 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यापैकी रु. 10.75 कोटी इतका प्राप्त झाला असून रु. 83.00 लक्ष इतका निधी आत्तापर्यंत वितरीत करण्यात आला आहे.
सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना या तीनही योजना प्रकारांसाठी रु. 336.62 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून रु. 108.34 कोटी निधी प्राप्त झाला कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून ऑगस्ट अखेर रु. 8.87 कोटी इतका निधी खर्च झाला आहे. त्यापैकी रु. 19.31 आहे. प्राप्त तरतुदीशी खर्चाची टक्केवारी 45.9 इतकी आहे.
नियोजन विभागाच्या शासन निर्णय दि. 25 मार्च 2015 नुसार महसुली व भांडवली योजनांची बचत आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना आहेत. या शासन निर्णयानुसार कोविड- 19 व इतर योजनांच्या बचती व मार्च अखेर मागणीच्या अनुषंगाने सन 2020-21 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण रु.59.12 कोटी रक्कमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये रु. 2.31 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये रु. 9.85 कोटी रकमेचे पुनर्वनियोजन करण्यात आले. वरील तीनही योजना प्रकारांसाठी एकूण रु. 71.27 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत कोविड-19 साठी आत्तापर्यंत रु.10.85 कोटी रकमेचे पुनर्विनियोजन करण्यात आले आहे. तरी सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत वरील तीनही योजना प्रकारांसाठी केलेल्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीस जिल्ह्यातील उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्यांचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचलन संजय पोईलकर यांनी केले.

Exit mobile version