लायन्सच्या रक्तदान शिबिरात २७ बाटल्या रक्तसंकलन

| अलिबाग | प्रतिनिधी |
मोठे शहापूर येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह तपासणी, रक्तदान शिबीर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब पोयनाड आणि प्रभात क्रीडा मंडळ, मोठे शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी 27 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

सेवा सप्ताहाअंतर्गत लायन्स क्लब पोयनाडने राबविलेल्या या उपक्रम प्रसंगी डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ट्रेझरल प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील, प्रमोद पाटील, हेमंत पाटील, संतोष पाटील, गावदेवी नवरात्रोत्सव प्रभात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अजित भगत व सहकारी, तसेच सुधीर थळे उपस्थित होते. रक्तदान शिबिरात 27 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. 90 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या 13 नेत्ररुग्णांवर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 16 जणांच्या मधुमेहा संदर्भात चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांत 127 नागरिकांनी सहभाग घेतला.

Exit mobile version