। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकासकामांना निधी कमी पडत असतो. सदर विकासकामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची वेळोवेळी यांची भेट घेऊन कर्जत नगरपरिषदेचे क्षेत्रातील प्रस्ताव सादर केले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए क्षेत्रातील रस्ते विकास योजनेंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीतील शिवम सोसायटी ते फायर स्टेशनकडे जाणारा रस्ता बांधकाम करणे यासाठी 2 कोटी, कर्जत नगरपरिषद हद्दीत भाजी मार्केट मल्टिपरपर युनिट तयार करणेसाठी 2 कोटी, कर्जत नगरपरिषद हद्दीत दहिवली येथील विठ्ठल मंदिर ते रमाकांत जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 4 कोटी 34 लाख रुपये, कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले बामचा मळा येथील रस्ता करणे 4 कोटी 99 लाख रुपये आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषद क्षेत्रातील अशा 5 कामांना 28 कोटी 33 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.