पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरातील भिंगरी गाव नारायण परदेशी यांची रूम भिंगारीगाव ओएनजीसी येथे राहणार वसीम रशीद खान, 35 हा व्यक्ती त्याच्या राहत्या घरातून कॉलीस कार घेऊन भाडे मारण्याकरिता जातो, असे सांगून निघून गेला आहे. मात्र अद्यापपर्यंत घरी परातलाच नसल्याने अफसाना वसीम खान यांनी पनवेल शहर गाठत बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. वसीम यांची उंची पाच फूट तीन इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, मिशी नाही, दाढी नाही, उजव्या हाताच्या बोटांमध्ये चांदीचे अंगठी, व दावे हातामध्ये काळ्या रंगाचे घड्याळ, उजवाय हाताच्या मनगटाला, लाल रंगाचा धागा, अंगात निळसर रंगाची जीन्स पॅन्ट, व लाईट निळ्या रंगाचा फुल शर्ट, पायात पावसाळा काळ्या रंगाचा बूट सोबत ओपो कंपनीचा मोबाईल त्यामध्ये सिम क्र. 8898437317 हा नामावर भाषा मराठी हिंदी अशा वर्णनाचा व्यक्ती कोठेही दिल्यास किंवा माहिती मिळाल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एस.बी.पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.