पिल्लई कॉलेजची ऑल टेरेन क्वाडबाईक राष्ट्रीय स्पर्धेत दुसरी

देशभरातील 40 महाविद्यालयांचा सहभाग
। पनवेल । वार्ताहर ।
रसायनीच्या एचओसी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली ऑल तेरे क्वाड बाईकने राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. मदुराई येथे झालेल्या इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स या राष्ट्रीय स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. देशभरातील 40 महाविद्यालयांच्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. 27 ते 31 जुलैदरम्यान पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत क्वाड बाईक बनविणार्‍या 22 जणांचा सहभाग होता.

इंडियन सोसायटी ऑफ न्यू एरा इंजिनियर्स या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते.तामिळनाडू मदुराई येथील पुल्लूर येथील सेतू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजात ही स्पर्धा आयोजित केली होती. कठीण परिस्थितीत रस्त्यावर चालणारी ही ऑल टेरेन क्वाड बाईक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याकरिता पिल्लई महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. 200 किलो वजनाची 250 सीसी इंजिन क्षमतेची क्वाड बाईक इतर कॉलेजच्या तुलनेत सरस ठरली असून, शेवटच्या राऊंडमध्ये आठ जणांना टक्कर देत क्वाड बाईकने दुसरा क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे, हे वाहन बनवताना तिच्या मजबुतीकडेदेखील विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष दिले. देशभरातील कॉलेजचा सहभाग असलेल्या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील पिल्लईच्या विद्यार्थ्यांची क्वाड बाईक देशात दुसरी येण्याचा बहुमान मिळाला आहे. दुसरा क्रमांक पटकाविल्यामुळे सर्वोत्तम क्षमता आणि इंधनबचत, सर्वोत्तम अक्स्लेरेशन, सर्वोत्तम ट्रँक्शन, सर्वोत्तम ससपेंन्शन, किल द हिल ट्रॉफी, सर्वोत्कृष्ट महिला सहभाग, सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बनावट आणि सजावट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सीएई पुरस्कार आदी नऊ पुरस्कार पटकावून क्वाड टॉर्क 2022 स्पर्धेवर छाप उमटवली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही बाब सर्वात प्रथम आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविणे आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. याकरिता कॉलेजचे सहकार्य, आमच्या टीमची मेहनत, सर्वाचीच साथ मोलाची आहे. या पुरस्काराने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.– अनिश शिवराजन, सदस्य, स्टार्कर्स मोटार स्पोर्ट्स, पिल्लई महाविद्यालयराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही बाब सर्वात प्रथम आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविणे आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. याकरिता कॉलेजचे सहकार्य, आमच्या टीमची मेहनत, सर्वाचीच साथ मोलाची आहे. या पुरस्काराने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

– अनिश शिवराजन, सदस्य, स्टार्कर्स मोटार स्पोर्ट्स, पिल्लई महाविद्यालय



Exit mobile version