शर्वरी बैकर शिष्यवृत्ती परीक्षेत द्वितीय

| तळा | वार्ताहर |

शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणार्‍या शर्वरी सुनील बैकर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. शांत, संयमी व अभ्यासात हुशार असलेल्या शर्वरी बैकर हिने आपले वडील शिक्षक सुनील बैकर व शिक्षक रत्नाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुक्यात द्वितीय तर, जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकावला आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक वर्ग व समाजातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version