आ. प्रशांत ठाकुरांना जोरका झटका; पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
प्रशांत ठाकूर यांच्या पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे भाजप आ. प्रशांत ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. उलवे नोडमधील पुष्पकनगरमधील सेक्टर 26 मध्ये हा भूखंड आहे. प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना 2019 मध्ये भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आता नगर विकास विभागाने आ. प्रशांत ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावावरील 300 कोटींचा भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकूर हे 2019 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होते. त्यावेळी भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. ठाकूर यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांच्या नावे असलेला भूखंड रद्द करण्याचे आदेश आता नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे ते चांगलेल अडचणीत सापडले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. याबाबत ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Exit mobile version