राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे. दुपारपासून मतदानाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्ते मतदारांना घेऊन मतदान करण्यासाठी काम करताना दिसून येतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर,बुथ कार्यकर्त्यांवर मतदान वाढविण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वाने दिल्याने, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि लगबग पाहायला मिळत आहे. त्यानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत गडचिरोली जिल्ह्याने बाजी मारली असून येथे सर्वाधिक 50.79 टक्के मतदान झाले आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 34.84 टक्के मतदान झाले आहे.

Exit mobile version