| रोहा | प्रतिनिधी |
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा शहरात शुक्रवारी (दि.2) समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोहा मेडिकल असोसिएशन व राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रोहा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व विविध क्षेत्रांतील नागरिकांनी रक्तदान करत या उपक्रमाला मोठे पाठबळ दिले. या शिबिरात तब्बल 32 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. रोहा नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, पत्रकार राजेंद्र जाधव, निलिकॉन कंपनीचे मालक मुकुंदभाई तुराकिया, रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील, विनोद पाशिलकर, समाधान शिंदे, संतोष पोटफोड, अमित मोहिते, डॉ. देशमुख यांच्यासह असंख्य हितचिंतकांनी उपस्थित राहून डॉ. जाधव यांना शुभेच्छा दिल्या.







