| पनवेल | वार्ताहर |
कामोठे वसाहती मधील एका सोनाराने प्रतिमहिना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून एका ग्राहकाला जवळपास 33 लाखाला चुना लावल्याची घटना घडली आहे.
कामोठे मधील ज्वेलरी दुकान चालकाने सोने खरेदीसाठी गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना 5 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. सेक्टर 34 मधील केतन गटे यांनी त्यांच्याकडे जुलै 2019 पासून तब्बल 36 लाख 70 हजार रुपये सोने खरेदीसाठी गुंतविले होते. परंतु संबंधित ज्वेलर्स चालकाने प्रत्यक्षात सोनेही दिले नाही व पैसेही परत केले नाहीत. पाठपुरावा केल्यानंतर 3 लाख 40 हजार रुपये परत दिले. परंतु उरलेले 33 लाख 30 हजार रुपये परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केतन यांनी कामोठे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.